अवसरी : राष्ट्रीय सेवा योजना एकक (B-SF-97) शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थीनी कु. ऋतुजा चंद्रशेखर शिर्के, तृतीय वर्ष, संगणक अभियांत्रिकी हिची २६ जानेवारी, २०२२ रोजी राजपथ, नवी दिल्ली याठिकाणी आयोजित राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनाकरिता निवड झालेली आहे. सदर संचलन शिबिराचे आयोजन दि. ०१ ते ३१ जानेवारी, २०२२ दरम्यान करण्यात आलेले आहे. .
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे दि. १२ ते २१ ऑक्टोबर, २०२१ दरम्यान आयोजित महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमधून कठीण चाचणीतून निवड झालेल्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनपुर्व शिबिरातून सदर विद्यार्थीनीची ह्या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनाकरिता निवड झालेली आहे..
“कोव्हिड-१९ च्या बंधानांमुळे यावर्षी महाराष्ट्रातून केवळ ०८ राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक (०४ मुले व ०४ मुली) यांची निवड २६ जानेवारी, २०२२ रोजी राजपथ, नवी दिल्ली याठिकाणी आयोजित राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन संचलनाकरिता करण्यात आलेली असून त्यात आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थीनीची निवड होणे ही बाब या महाविद्यालयासाठी निश्चितच अभिमानाची आहे”, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी व्यक्त केले असून सदर निवडीबद्दल कु. ऋतुजा चंद्रशेखर शिर्के हिचे महाविद्यालयातर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहे.
डॉ प्रभाकर देसाई (राज्य संपर्क अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र शासन तथा संचालक राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) आणी डॉ.डी.कार्तिकेयन (विभागीय संचालक राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र व गोवा राज्य भारत सरकार) यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन विद्यार्थीनीस मिळाल्यामुळे महाविद्यालयातर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सदर विद्यार्थीनीस हे यश संपादन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री. मंगेश पांचाळ, राष्ट्रीय सेवा योजना कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. शशिकांत घुंबरे व विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे प्रोत्साहन प्राप्त झाले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: